बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जॉनी बेयरस्टोला वॉशिंग्टन सुंदर भिडला, भर मैदानात ‘राडा’, पाहा व्हिडिओ

अहमदाबाद | इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा 8 विकेटने मोठा पराभव झाला. या मॅचमध्ये सुरूवातीला बॅट्समननी निराशा केली. श्रेयस अय्यरचं अर्धशतक वगळता टीम इंडियाच्या दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. टॉस हरल्यानंतर पहिले बॅटिंग करत भारताने 20 ओव्हरमध्ये 124 रनपर्यंत मजल मारली. यानंतर भारतीय बॉलरपुढे हे आव्हान रोखण्याचं आव्हान होतं, पण त्यांनाही मैदानात कमाल करता आली नाही.

या मॅचमध्ये वॉशिंग्टन सुंदर आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात मैदानामध्येच बाचाबाची झाली. इंग्लंडची बॅटिंग सुरू असताना 14 व्या ओव्हरमध्ये सुंदरच्या बॉलिंगवर डेव्हिड मलानने सरळ शॉट मारला, त्यावेळी बेयरस्टो मध्ये आल्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला सोपा कॅच पकडता आला नाही, त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर बेयरस्टोवर भडकला आणि दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. अखेर अंपायरना या दोघांच्या वादात हस्तक्षेप करावा लागला.

तर दुसरीकडे युझवेंद्र चहल टी-20 आंतरराष्ट्रीयमधला टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी बॉलर बनला आहे. चहलने जॉस बटलरला एलबीडब्ल्यू केलं, ही त्याची आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधली 60 वी विकेट ठरली. 46 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये 8.34 रनच्या इकोनॉमी रेटने चहलने हा रेकॉर्ड केला आहे. याआधी बुमराह भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर होता. बुमराहने 50 मॅचमध्ये 20.25 ची सरासरी आणि 6.66 च्या इकोनॉमी रेटने 59 विकेट घेतल्या होत्या.

दरम्यान, याचसोबत चहलची ही 100वी आंतरराष्ट्रीय मॅच होती. 2016 साली हरारेमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मधून चहलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वनडेमध्ये त्याने 54 मॅचमध्ये 92 विकेट घेतल्या आहेत.

थोडक्यात बातम्या – 

काँग्रेस सर्वात भ्रष्टाचारी पक्ष आहे, तुम्ही भाजपला मत द्या- स्मृती इराणी

मनोरंजन क्षेत्रात कोरोनाची दहशत, बॉलिवूडचे ‘हे’ दोन मोठे कलाकार कोरोनाच्या जाळ्यात!

खुशखबर! फक्त 1.11 लाखात घरी न्या किया सेल्टाॅस कार

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंत्रालयातील ‘या’ विभागांमध्ये चालणार दोन शिफ्टमध्ये काम

बकरीसमोर पाऊट करणं पडलं महागात, बकरीने केलं असं काही की…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More