महाराष्ट्र मुंबई

लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Actor Navdeep, Co Founder C Space Along With Rakesh Rudravanka - CEO - C Space
Loading...

मुंबई | लॉकडाउनच्या दिवसांत विनाकारण घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. असे असताना देखील प्रसिद्ध विनोदवीर जॉनी लिव्हर यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र आई ओरडताच जॉनी पुन्हा एकदा घरात जाऊन बसले.

जॉनी लिव्हर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन हा संपूर्ण किस्सा आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. घरात बसून बसून मी कंटाळलो आहे. किती टीव्ही पाहणार?, किती बातम्या ऐकणार?, कुटुंबासोबत किती गप्पा मारणार? म्हणून मी थोडे पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडलो. इतक्यात माझ्या आईने मला थांबवले. ती माझ्यावर ओरडायला लागली, असं जॉनी लिव्हरने सांगितलं आहे.

रागावलेली आई पाहून मी घाबरलो आणि शांतपणे घरात जाऊन बसलो, असं म्हणत जॉनीने तो गंमतीशीर किस्सा आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी तर आपल्या आईचं ऐका आणि घरातच राहा असाही सल्ला त्यांना दिला आहे.

 

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ तारखेपासून होणार प्रक्षेपण

सॅल्यूट… आभाळाएवढं मन असणाऱ्या टाटांची आणखी 1 हजार कोटींची मदत!

महत्वाच्या बतम्या-

नागरिकांना पैशाची उणिव भासणार नाही- सीतारामन

आई-वडीलांना मरण्यासाठी सोडू शकत नाही; अक्षय कुमारकडून 25 कोटींची मदत

इटलीत कोरोनामुळे हाहाकार; मृतांची संख्या 10 हजारांवर

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या