मुंबई महापालिकेच्या ‘या’ निर्णयाला अभिनेता जॉन अब्राहमचा विरोध

मुंबई | महाराष्ट्र सरकारने मुंबईत मेट्रो 3 कारशेडसाठी 33 हेक्टरवर पसरलेली झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यालाच अभिनेता जॉन अब्राहमने विरोध केला आहे.

सरकारने आरे कॉलनीतील 33 हेक्टरवर पसरलेली हिरवळ नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण योग्य दिशेने वाटचाल करतोय का? असा प्रश्न मला पडतो. झाडाच्या कत्तलीसह कोस्टल रोडलाही माझा विरोध आहे, असं जॉन अब्राहमने म्हटलं आहे.

मेट्रो रेल्वेसाठी आरे कॉलनीतील प्राणी, झाडं आणि रहिवाशांचं विस्थापन करणं अनाकलनीय आहे, असं जॉनने म्हटलं आहे.

दरम्यान, पर्यावरणप्रेमी आणि विस्थापितांकडून मुंबई महापालिकेला आणि मेट्रो रेल कॉर्पोरेशनला आतापर्यंत 82 हजार पत्रं मिळाली आहेत. यामध्ये रणदीप हुडा, दिया मिर्झा याचांही सामावेश आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-वाढदिवसाला हारतुरे नको विद्यार्थ्यांना मदत करा; धनंजय मुंडेंचं आवाहन

-भाजप पैशांच्या बळावर सरकार पाडतं- राहुल गांधी

-टीम इंडियाच्या पराभवानंतर विवेक ओबेरॉयचं ट्विट; चाहते संतापले

-अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून आयपीएस अधिकाऱ्याचा मोठा दावा

-मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Loading...