बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे कोरोनामुक्तीकडे! कोरोनाच्या घटत्या रूग्णसंख्येमुळे पुण्यातील ‘हे’ जम्बो कोव्हिड सेंटर बंद

पुणे | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याच्या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून आली आहे. मोठ्या आणि प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे सीओईपीच्या मैदानावरील जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गरज पडल्यास हे जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा चालू करणार असल्याचं अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितलं.

पहिली लाट ओसरल्यानंतर जम्बो रुग्णालय 15 जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेमुळे 22 मार्चपासून जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले होते. दुसऱ्या लाटेत 22 मार्च ते 1 जुलै दरम्यान एकूण 3009 रुग्ण जम्बोमध्ये दाखल झाले होते. त्यापैकी 1909 जण बरे होऊन घरी परतले होते. तर 654 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुबल अग्रवालांनी दिली.

दरम्यान, एकवेळ पुण्यात अशी परिस्थिती झाली होती की कोरोना रूग्णांसाठी बेड उपलब्ध नव्हते. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या जात होत्या. त्याच पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर बंद होत आहे ही पुणेकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे.

थोडक्यात बातम्या- 

पोलीस विभागाबाबत महत्त्वाची बातमी! ‘पोलीस शिपाईही होणार पीएसआय’, गृहमंत्री वळसे-पाटलांचा प्रस्ताव

“राज्य सरकार वारकऱ्यांना देखील सोडत नाही, त्यांचीही मुस्कटदाबी करत आहे”

एक आजार ज्यामुळे आपलं होत आहे दगडात रुपांतर , ‘या’ चिमुकलीचं शरीर झालं दगडागत!

कल्पना चावलानंतर ‘ही’ भारतीय तरुणी घेणार अंतराळात झेप

“पाच वर्षात काय दिवे लावलेत ते चंद्रकांतदादांनी सांगावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More