उदयनराजेंच्या संपत्तीत 5 महिन्यात झाली ‘इतकी’ वाढ!

सातारा | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये आलेले छत्रपती उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी ही लढत होणार आहे. निवडणुकीचा अर्ज दाखल करताना उदयनराजे यांनी त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे.

मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 5 महिन्यात उदयनराजेंच्या संपत्तीत दीड कोटींनी वाढ झाली आहे. उदयनराजे यांची एकूण मालमत्ता 13 कोटी 81 लाखवरून 14 कोटी 44 लाखांवर पोहोचली आहे. त्यांच्याकडे 40 किलोचे दागदागिने देखील आहेत.

उदयनराजेंकडे ऑडी, मर्सिडिज बेन्झ, इण्डेवर अशा गाड्या देखील आहेत. याशिवाय 185 कोटींची स्थावर मालमत्ता असून त्यातून त्यांना उत्पन्न देखील मिळते.

दरम्यान, उदयनराजेंच्या विरूद्ध निवडणूक लढवणारे राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हे देखील श्रीमंत आहेत. पाटील यांच्याकडे 10 कोटींची संपत्ती तर 11 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. पाटील यांनी मुंबईतील वादग्रस्त गृहनिर्माण सोसायटीला 60 लाखांचे कर्ज दिल्याचं बोललं जातं.

महत्वाच्या बातम्या-