“आ देखे जरा किसमे कितना है दम”; ज्योतिरादित्य शिंदेंचं भाजपला आव्हान

लखनऊ | काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी लखनऊ येथील रोड शोनंतर ‘आ देखे जरा किसमे कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया’, असं म्हणत भाजपला आव्हान दिलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

लखनऊ शहरात राहुल गांधी, प्रियांका गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, यांच्या उपस्थितीत रोड शो काढण्यात आला होता.

रोड शोला अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या जनतेचं आभार मानत असून राज्यातील जनता परिवर्तन करण्यासाठी आतुरलेली आहे, असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘जन जन की यही पुकार अलविदा जुमला सरकार’ असं ट्विट करून ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

नरेंद्र मोदींना तुरुंगात टाकलं पाहिजे- राहुल गांधी

निवडणूकीआधी 5 कोटी घरांवर पक्षाचा झेंडा फडकवण्याचा भाजपचा संकल्प

-मोदींनीच अनिल अंबानींना राफेल कराराची माहिती दिली- राहुल गांधी

पवार कुटुंबातील 4 सदस्य लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं

-मोदींच्या उपस्थितीत मंत्र्याने महिलेला ‘नको’ तिथे लावला हाथ

Google+ Linkedin