बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काबूल पडलं, राष्ट्रपती भवन ताब्यात; अफगाणिस्तानची सुत्रं तालिबानच्या हातात

नवी दिल्ली | गेली कित्येक वर्ष तालिबान आणि अफगानिस्तान सरकार यांच्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाला आता नवं वळण मिळालं आहे. तब्बल 20 वर्षांनंतर तालिबानने अफगाणिस्तावर कब्जा मिळवला आहे. तालिबानने अखेर अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर पुर्णपणे कब्जा मिळवून राष्ट्रपती भवन ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे अखेर अफगाणिस्तानच्या सरकारला तालिबानपुढे शरणागती पत्करून देशाची सर्व सुत्र तालिबानच्या ताब्यात देणं भाग पडलं आहे.

गेल्या दोन तीन दशकापासून अफगाणिस्तानात सत्ता संघर्ष सुरू होता. प्रथम रशिया आणि नंतर अमेरिकेने अफगाणिस्तान सरकारला तालिबान विरोधात मदत केली होती. अखेर जुलै महिन्यात अमेरिकेने आणि नाटोने अफगाणिस्तानातील आपलं सैन्य मागं घेतलं. त्यानंतर तालिबानने पुन्हा तयारी करत केवळ 100 दिवसात अफगाणिस्तानचा कब्जा मिळवला आहे. राजधानी काबूलला चारही बाजूंनी घेरून त्यांनी अखेर राष्ट्रपती भवन देखील काबीज केलं आहे.

तालिबानच्या फौजा काबूल जवळ येत असल्याचं कळताच अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आणि मंत्रीमंडळासह त्यांनी देश सोडला. सध्या त्यांनी ताजिकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे. काबूलच्या सीमेवर तालिबानचं सैन्य पोहोचताच गोळ्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. त्यानंतर जनतेने घाबरून जाण्याचं कारण नाही, असं तालिबानने स्पष्ट केलं आणि शांततेत राजधानी काबूल ताब्यात घेतली. उत्रामीही यांनी

दरम्यान, भारत सरकारने भारतीय नागरिकांना अफगाणिस्तानातून वेळीच एअरलिफ्ट केलं आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या अनेक मोठ्या व्यक्तींना देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. आता पुर्णपणे सत्ता तालिबानच्या हातात आल्यानं अफगाणिस्तानचे नवे राष्ट्रपती अली अहमद जलाली असणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

“तुम्ही नारळ फोडत रहा, निवडणुकीत उमेदवारी मात्र मला मिळो”

पवनदीप राजन ठरला 12 व्या सिझनचा इंडियन आयडॉल!

पत्नीच्या नावावर घर खरेदी कराल तर मिळतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या अधिक माहिती

“इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि तुम्ही नाव कसलं बदलता”

“नागरिकांना कोरोना लसीचे दोन डोस उपलब्ध करून देणं सरकारचीच जबाबदारी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More