Top News क्राईम देश

नगरसेवकाच्या हत्येचं धक्कादायक CCTV फुटेज; हलक्या काळजाच्या लोकांनी पाहू नये!

हैदराबाद |  आंध्रप्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील काकीनाडात मनाला विचलित करणारे हत्याकांड घडले आहे. काकीनाडा महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवकाच्या अंगावर दोन ते तीन वेळा कार चढवून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेत नगरसेवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सीसी़टीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला हत्येचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या घटनेतील मृत नगरसेवकाचं नाव काम्परा रमेश असून नगरसेवकाला गाडीने चिरडणारा आरोपी गुलजारा चिन्ना आहे. हत्येवेळी प्रत्यक्षदर्शींनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चिन्नाने गाडी मागे पुढे करत थेट नगरसेवकाच्या अंगावर गाडी घातली. हत्येनंतर तो घटनास्थळावरुन फरार झाला होता. पोलिसांनी सीसी़टीव्ही फोटोजच्या आधारे आरोपी चिन्नाला अटक केली आहे.

ही घटना मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास वलसपाकला गावात कार धुण्याच्या केंद्रावर घडली. मृत नगरसेवक काम्परा रमेश आणि आरोपी गुलजारा चिन्ना दोघंही मद्यावस्थेत होते. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

हत्येची माहिती मिळताच काकीनाडाचे डी.एस.पी व्ही. भीमा राव, काकीनाडा ग्रामीण व शहर निरीक्षकांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रस्ट हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला. या घटनेमुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुरावे गोळा करुन हत्येचा सविेस्तर तपास पोलिसांकडून केला जात आहे.

मृत नगरसेवक YSR काँग्रेसचा असल्याने काकीनाडा शहरातील राजकीय वर्तुळात संतापाची लाट पसरली आहे. कृषिमंत्री कुरसला कन्नबाबू, शहरचे आमदार द्वारमपुडी चंद्रशेखर रेड्डी आणि नगराध्यक्षांनी शोक व्यक्त केला आहे.

माहितीनुसार, काम्परा रमेश एकेकाळी शहर कॉग्रेसचे अध्यक्ष होते आणि नंतर वायएसआर नेते आणि मंत्र्यांचे निकटचे सहकारी झाले. रमेश काकीनाडा महानगरपालिकेत काँग्रेसचे फ्लोर लीडर देखील होते. जमिनीच्या व्यवहारातही ते सामील असायचे.

काकीनाडा शहरात नगरसेवकाच्या हत्येची ही तिसरी घटना आहे. या आधी लॉरी ट्रान्सपोर्ट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अब्बू चौधरी, ट्रक ऑपरेटर युनियनचे नेते व्हेगुर्ला शिव यांचीही हत्या करण्यात आली होती.

पाहा थरारक व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या

आता येतेय सर्वात स्वस्त स्कॉर्पिओ; किंमत असणार फक्त….

‘या’ कारणामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अद्याप कारवाई नाही!

सेक्स करताना संमतीशिवाय कंडोम काढणं आता बेकायदेशीर; होणार शिक्षा!

तो आला, पत्नीला प्रियकरासह पाहिलं, अन् त्यानंतर रंगला खुनी खेळ!

राजकारणातील बादशहाला भेटायला बॉलिवूडचा शहेनशहा बारामतीत?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या