मुंबई | अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटरने अकाउंट बंद केलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणावत चांगलीच आक्रमक झाली आहे. कंगणाने थेट ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांच्यावर टीका केली आहे.
कंगणाने जॅक डोर्सी यांचं 5 वर्षापुर्वीचं एक ट्विट शोधलं आहे. त्या ट्विटमध्ये, ट्विटर अभिव्यक्ति स्वातंत्र्यासोबत आहे. सत्य बोलणा-याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचं जॅक डोर्सी यांनी ट्विट केलं होतं. कंगणाने या ट्विटला उत्तर दिलं आहे.
तुम्ही अजिबात अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा पुरस्कार करत नाही. मुस्लिम राष्ट्र आणि चीनी खुशमस्क-यांनी तुम्हाला पूर्णपणे खरेदी केलं आहे. तुम्ही फक्त फायद्यासाठी काम करता. अशा लोकांव्यतिरिक्त अन्य लोकांसोबत तुम्ही पक्षपातीपणाने वागत असल्याचं म्हणत कंगणाने डोर्सींवर टीका केली आहे.
दरम्यान, तुम्ही काय तर लोभाचे गुलाम बनले आहात. पुन्हा असले दावे करू नका, हे लाजीरवाणं वाटत असल्याचं कंगणा म्हणाली.
No you don’t,Islamists nation and Chinese propaganda has bought you completely, you only stand for your petty gains. You shamelessly show intolerance for anything other than what they want. U are nothing but a little slave of your own greeds. Don’t preach again its embarrassing. https://t.co/jDn97OVrHU
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 10, 2021
थोडक्यात बातम्या-
‘माझ्या जीवाचं काही बरं-वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार’; भाजप खासदाराचा सरकारला इशारा
“ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार”
आमचं संरक्षण केवळ पोलीस करतो असं नाही- रावसाहेब दानवे
‘इतर नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे तर….’; शरद पवारांची गुगली