दुबई | सनराइजर्स हैदराबाद विरूद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या उपांत्य फेरीत अखेर दिल्लीने बाजी मारली. हैद्राबादच्या केन विलियम्सनने दिलेली कडवी झुंज अखेर अपयशी ठरली. या सामन्यानंतर केनने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
केन विलियम्सन म्हणाला, “दिल्लीची टीम चांगली असून त्यांनी आमच्या विरूद्ध खूप चांगला खेळ केला. तर दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना रिस्क घेणं गरजेचं होतं.”
“सुरुवात खराब झाली मात्र मधल्या फळीत काही चांगल्या भागीदाऱ्या केल्या. विजयाची थोडी संधी होती, पण आम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकलो नाही ही खरंच शरमेची गोष्ट आहे. गेल्या 3 आठवड्यांमध्ये आम्ही ज्या पद्धतीने खेळ केला त्याचा आम्हाला अभिमान,” असल्याचंही केनने म्हटलंय.
दिल्लीविरुद्ध केन विलियम्सनने 67 धावांची खेळी केली. मात्र ती व्यर्थ ठरली. रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्धच्या सामन्यात केनच्या महत्त्वपूर्ण खेळीने हैद्राबादने विजयी झेंडा फडकवला होता.
महत्वाच्या बातम्या-
ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहा; शिवसेनेचा भाजपाला टोला
अन्यथा वारकरी संप्रदाय येणाऱ्या सर्व निवडणूकांवर बहिष्कार टाकेल
“ज्या दिवशी बकरीशिवाय ईद साजरी होईल, तेव्हाच फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होणार”
“मी अर्णब गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवूण दाखवा”
…तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना स्मशानात पाठवू, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान