मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केल्यापासून कंगणा ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेवर टीका करत आहे. अशातच पुन्हा एकदा कंगणाने राज्य सरकार आणि महापालिकेवर निशाणा साधला आहे.
बीएमसीने माझे कार्यालय बेकायदेशीरपणे पाडण्यासाठी वकिलांवर आत्तापर्यंत 82 लाख रुपये खर्च केले आहेत. एका मुलीचा छळ करण्यासाठी पप्पाचा पप्पू सार्वजनिक पैशांचा वापर करत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं कंगणाने म्हटलं आहे.
भाजपनेही वकिलांच्या खर्चावरून मुंबई महापालिकेवर टीका केली होती. त्यावर पैसे खर्च केले नसते तर मग ती जे आरोप करतेय ते मान्य करायला लागले असते. भाजपला डबल ढोलकी वाजवायला आवडते वाटतं, असं प्रत्युत्तर दिलं होतं.
दरम्यान, दसरा मेळाव्याच्या भाषणातही मुख्यमंत्र्यांनी कंगणावर टीका केली होती. मात्र कंगणाने वकिलांच्या खर्चावरून पुन्हा एकदा राज्य सरकारला आणि महापालिकेला लक्ष्य केलं आहे.
Muncipal Corporation so far spent 82 lakhs on lawyer for illegally demolition of my house, papa’s Pappu spending public money to tease a girl, this is where Maharashtra stands today, very unfortunate. https://t.co/v6gQFJqdvL
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 28, 2020
महत्वाच्या बातम्या-
…तर लोक मोदींना हाकलून लावतील- राहुल गांधी
शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय- शरद पवार
कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये- शरद पवार
राज्यपाल कोट्यातील एक जागा देण्याचं तीन महिन्यापूर्वी ठरलं होतं, पण आता…- राजू शेट्टी