बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून मी कर भरला नाही’; कंगणाने कर न भरण्याचं दिलं ‘हे’ कारण

मुंबई | मी सर्वाधिक कर भांडवलात येते. मी माझ्या उत्पन्नावर 45% कर भरते. मी सर्वात जास्त कर देणारी अभिनेत्री आहे पण काम नसल्यामुळे मी गेल्या वर्षाचा अर्धा कर भरला नाही, असं अभिनेत्री कंगणा राणावतने म्हटलं आहे.

आयुष्यात मी पहिल्यांदाच कर भरण्यास उशीर केला आहे, परंतु जर सरकारने माझ्यावर थकबाकी असलेल्या कर रकमेवर व्याज आकारले तर मला हरकत नाही. वेळ आमच्यासाठी कठीण असू शकते, परंतु एकत्र आपण वेळोवेळी मजबूत बनू शकतो, असं कंगणाने म्हटलं आहे.

कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. तसेच थकित रकमेवर सरकारने व्याज आकारले तरी तिला त्यात कोणतीही अडचण नाही, असं कंगणाने म्हटलंय.

दरम्यान, कंगणा राणावत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. विविध सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर तिने दिलेल्या प्रतिक्रियांमुळे अनेकदा वाद झाले आहेत. यामुळे तिला अनेकवेळा ट्रोलचा सामनाही करावा लागला आहे. अलीकडचे ट्विटरने कंगणावर कारवाई करत तिचं ट्विटर अकाऊंट संस्पेंड केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“अन्यायकारक कायद्याची सर्वाधिक झळ महाराष्ट्राला; राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा केंद्राचा डाव”

लहान मुलांना कोरोना झालाय?; केंद्र सरकारच्या ‘या’ मार्गदर्शक सूचना नक्की वाचा…!

अखेर आयपीएलचा मुहूर्त ठरला; आयपीएलच्या तारखांबाबत बीसीसीआयची अधिकृत घोषणा

“मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी ही कोणाची जबाबदारी?”

‘50% लहान मुलांच्या शरिरात कोरोना अँटीबाॅडी’; लसीच्या चाचणीपुर्वी धक्कादायक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More