बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझा जुना मुर्ख बॉयफ्रेन्ड अजून…’; कंगणाची हृतिक रोशनवर बोचरी टीका

मुंबई । अभिनेत्री कंगणा राणावतने पुन्हा एकदा हृतिक रोशनला लक्ष्य केलं असून त्याच्यावर टीका केली आहे. कंगणाने यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. तिचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कंगणा आणि हृतिक रोशन यांच्यात प्रेमसंबंध असल्याची बाब हृतिकने नेहमी नाकारली. तर दुसरीकडे कंगणा राणावतने हे प्रेमप्रकरण असल्याचा दावा केला होता. यावर हृतिकने कंगणा ज्या ई मेल आयडी शी बोलत होती. तो बनावट असल्याचा दावा हृतिकने केला होता. याप्रकरणी त्याने अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला.

कंगणाने मात्र हृतिकनेच तिला हा ईमेल आयडी दिला होता. आणि ते 2014 पासून त्या ईमेल आयडी वरूनच बोलायचे. त्यानंतर कंगणाने अनेकदा हृतिक रोशनवर विविध प्रकारचे आरोप केले आहे. तिने बऱ्याच वेळा मुलाखतीत हृतिकचा अपमानही केला आहे. आता पुन्हा एकदा तीने हृतिकवर निशाणा साधलाय.

हृतिकला समन्स बजावल्याची बातमीला क्वोट करत कंगणाने एक ट्विट केलं आहे. जग कुठून कुठे पोहचलं, तरी माझा जुना मुर्ख बॉयफ्रेन्ड अजून तिथेच आहे. त्याच वळणावर आहे, ती पुन्हा फिरून येणार नाही, असं कंगणाने म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

भारताच्या पराक्रमी लेकीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ‘या’ पदावर नियुक्ती

मोठी बातमी! 10 आणि 12 च्या बोर्डाच्या परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर

‘तुम्ही कोणाचीही तोंड चिपकवा मला….;’ चित्रा वाघ आक्रमक

“श्रीदेवीनंतर सातत्याने विनोदी भूमिका साकारणारी बॉलिवूडची मी दुसरी अभिनेत्री”

“माझी बहिण प्रीतम, पंकजा मुंडे यांच्यासोबतही फिरली ते फोटो का व्हायरल करत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More