महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरेंऐवजी फडणवीस मुख्यमंत्री असते तर…- कंगणा राणावत

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत आणि शिवसेनेमधील वाकयुद्ध काही थांबेल असं काही दिसत नाही. तरी काही प्रमाणात आता शिवसेनेने कंगणाच्या विषयावर बोलणं टाळणं पसंद केलं आहे परंतू कंगणाची ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवरील टीका अद्यापही चालूच आहे. अशातच कंगणाने आणखी एक ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

माफियांचे लाड करणारी भ्रष्ट सोनिया सेना सत्तेत नसती आणि त्या जागी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असते तर मुंबई पोलिसांना दडपण घेता त्याचं काम करता आलं असतं आणि सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणाता तपास नीट झाला असता, असं कंगणा राणावतने म्हटलं आहे.

कंगणाने ट्विटमध्ये शिवसेनेचा पुन्हा एकदा सोनिया सेना म्हणत उल्लेख केला आहे. कंगणा आपल्या घरी गेली आहे. त्याआधी तिने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.

दरम्यान, रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही कंगणाची भेट घेत तिला जाहीरपणे पाठींबा दिला होता. त्यासोबत आठवलेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.

 

महत्वाच्या बातम्या-

कांदा निर्यात बंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार- दादा भुसे

‘आमचं वेतन घ्या पण…’; खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केली ही विनंती

“संपूर्ण देश सैन्यासोबत उभा आहे, तुम्ही चीनविरोधात कधी उभे राहणार?”

“राजभवनाचं सध्या आरएसएस शाखा किंवा भाजप कार्यालय म्हणून नामकरण करावं का?”

शरद पवारांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी- खासदार संभाजीराजे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या