Top News मनोरंजन

‘अचानक अभिषेक फासावर लटकल्याचा दिसला तर…’; कंगणा राणावतचं जया बच्चन यांना प्रत्युत्तर

नवी दिल्ली | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतवर समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी निशाण साधला. राज्यसभेत बोलताना त्यांनी कंगणाचं नाव न घेता तिच्यावर टीका केली. या टीकेवर प्रत्युत्तर देताना कंगणा राणावतने जया बच्चन यांना सवाल केले आहेत.

ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणत आहेत याला माझा विरोध राहिलं. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते, असं जया बच्चन यांनी म्हटलं होतं. यावर कंगणाने बच्चन यांना उत्तर दिलं आहे. यासंदर्भात तिने ट्विट केलं आहे.

जयाजी, माझ्या जागी तुमच्या मुलीला श्वेताला जर किशोरवयात कोणी मारहाण केली असती, तिला ड्रग्स दिले असते आणि तिच्यासोबत गैरवर्तणूक केली असती तर तेव्हादेखील तुम्ही असंच म्हणाला असतात का?, तसंच अभिषेक सातत्याने छळ आणि गुंडगिरीचा त्रास होतोय अशी तक्रार करत असेल आणि एक दिवस तो अचानक फासावर लटक्याचं दिसून आला तर?, असं कंगणा राणावतने म्हटलं आहे.

आमच्यासाठी सुद्धा कधीतरी प्रेमाने हात जोडण्याचा प्रयत्न करा, असं आवाहनही कंगणाने जया बच्चन यांना केलं आहे. दरम्यान, कंगणाने दिलेल्या या प्रत्युत्तरावर सोशल माध्यमावर नेटकऱ्यांनी कंगणाला ट्रोल केलं आहे तर काहींनी कंगणाला पाठींबा दर्शवला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

व्यापाऱ्याला मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्या- शरद पवार

‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’; जया बच्चन यांचा रवि किशन यांना अप्रत्यक्ष टोला

काळ कठीण आहे फोन बंद ठेवू नका, 3 वाजताही कुणी फोन केला तरी उचला- चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथं तसं काही होईल वाटत नाही- निलेश राणे

…नाहीतर माझी जवानी अशीच निघुन जाईल; कोरोनाग्रस्त ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या