Top News महाराष्ट्र मुंबई

‘मला तोंड फोडण्याची धमकी दिली होती आणि आता…’; कंगणाचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

 मुंबई | अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या तपासापासून कंगणा राणावत आणि शिवसेनेमध्ये संघर्ष चालू झाला होता. मात्र कंगणा आपल्या ट्विटरवरून कोणत्या ना कोणत्या वक्तव्यावरून चर्चेत असते. अशातच कंगणाने पुन्हा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं म्हणून सरनाईक यांना ईडीने पुन्हा बोललं जात आहे. याचाचा धागा पकडत कंगणा राणावतने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधला आहे.

मी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली होती तेव्हा मला तोंड फोडण्याची धमकी दिली. भारतीयांनो आजचं ओळखा, कोण तुमच्या साठी सर्व काही पणाला लावतंय आणि कोण तुमच्याकडून सर्व काही हिसकावून घेत आहे. तुमचा आज ज्यांच्यावर विश्वास आहे ते तुमचं भविष्य असणार’, ‘इंडिया पाकिस्तान ना बन जाए संभालो यारों, असं कंगणाने म्हटलं आहे. कंगणाने रिट्विट करत सरनाईकांना टोला लगावला आहे.

दरम्यान, पाकिस्तानचा आणि माझा काहीही संबंध नाही. पाकिस्तानविरोधात आयुष्यभर मी लढलो. अशा प्रकारे खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचं सरनाईक यांनी खुलासा करताना स्पष्ट केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण

‘अवघ्या सात तासाच्या अधिवेशनात जनतेचे प्रश्न कसे मांडायचे?’; फडणवीसांचा सरकारला सवाल

…तर मुंबईत महापौर भाजपचा आणि उपमहापौर आरपीआयचा- रामदास आठवले

“मन खचून गेले हे बघून….त्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती बघायला मिळते”

कोरोनाने रायकर कुटुंबाचा केला पुन्हा घात; कुटुंबातील या व्यक्तिचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या