बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्यावरचे ‘ते’ आरोप बिनबुडाचे’, कंगनाची उच्च न्यायालयात धाव

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि वादग्रस्त वक्तव्य हे जूनं समीकरण झालं आहे. कंगना रनौत अनेक मुद्द्यांवर तिचं रोखठोक मत मांडते. कंगनाने केलेली अनेक खळबळजनक वक्तव्य, सोशल मीडियावरील पोस्ट कित्येकदा तिच्या अंगलट देखील आली आहेत.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे कित्येकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कंगनाने पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर कंगनाने शीख समुदायाची तुलना खलिस्तान्यांशी केली होती. याप्रकरणी कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आपल्या विरोधात नोंदवलेला गुन्हा चुकीचा असल्याचा दावा कंगनाने केला आहे. या प्रकरणी नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. याप्रकरणाची सुनावणी पुढच्या आठवड्यात पार पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ’21 नोव्हेंबर रोजी केलेली पोस्ट ही कृषी कायदे (Farm Law) रद्द केल्यानंतर बंदी घालण्यात आलेल्या एका संघटनेविषयी होती. आपण फक्त मूलभूत अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केल्याबद्दल द्वेषयुक्त भावनेने खटला चालवण्यात येत आहे,, असंही कंगनाने याचिकेत म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार म्हणतात…

कोरोना अपडेट! राज्याच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ

काँग्रेसचा सेल्फगोल! “पक्षाच्या नाहीतर अपक्ष उमेदवाराला मतदान करा”

Omicronचा धोका वाढतोय! केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दो दिलों का मिलन! कैफ-विकीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More