कानपूर | कानपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बलात्कार करून रात्री उशिरा तिला शेतात बेशुद्धावस्थेत फेकून दिल्याची माहिती आहे. घाटमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली.
पीडित मुलगी शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास शौचासाठी शेताच्या दिशेने गेली होती. तिथे गावातील तिघे जण होते. तिघांनी दुचाकीवरून तिचे अपहरण केले. तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं कळतंय.
पीडितेचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. मात्र, ती कुठेच सापडली नाही. तिचा शोध घेतानाच ते शेतावर पोहोचले. त्यावेळी मुलगी बेशुद्धावस्थेत सापडली.
बलात्काराच्या घटनेची माहिती मिळाली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गावातीलच तिघा तरुणांनी मुलीवर बलात्कार केला. तिचे दुचाकीवरून अपहरण केले होते. मुलीने दोन आरोपींची नावे सांगितली आहेत. तिसऱ्या तरुणाला ती ओळखत नाही, असं पीडितेच्या वडिलांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
विना मास्क बुलेट सवारी करणं पडली महागात; नवनीत राणा आणि आमदार रवी राणांवर गुन्हा दाखल
गजानन मारणे प्रकरणाला वेगळं वळण; ‘ती’ लॅंड क्रुझर आणणाऱ्यासह 8 जणांना अटक!
पल्लवी पाटीलचे बोल्ड फोटो सोशल मीडियात व्हायरल!
“खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना झाला, शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं पाहिजे”
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक