Top News अहमदनगर महाराष्ट्र

धर्माच्या पलीकडचं नातं; मुस्लिम मामाकडून हिंदू मुलींचं कन्यादान

अहमदनगर | भारतीय एकतेचं दर्शन घडवणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुसलमान मामा आपल्या मानलेल्या हिंदू बहिणीच्या मुलींचं कन्यादान करताना दिसतोय.

हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहेत. तसंच अनेकजण या सामाजिक एकतेचे उदाहरण असलेल्या फोटोवर आपली भावना व्यक्त करत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे एका लग्नातील हा फोटो आहे. या लग्नाची चर्चा शेवगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार सुरू आहे.

बोधेगाव येथे सविता भुसारी या शेतकरी कुटुंबातील असून, त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. नवऱ्याने सोडून दिल्याने त्या आईवडिलांकडे राहत आहेत. तिथेच त्यांनी त्यांच्या मुलींना मोठे केले. तसेच या महिलेला भाऊ नसल्याने त्यांनी घरासमोर राहणाऱ्या बाबा पठाण यांना गुरू भाऊ मानलं आहे.

दरम्यान, बाबा पठाण यांनी देखील जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म दाखवत हिंदू मुलींचे मामा होऊन कन्यादान केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“कोरोनाची साथ येत्या दोन वर्षांच्या आत संपुष्टात येईल”

“भारतीय संघात हा खेळाडू असता, तर भारत 2019 चा विश्वचषक जिंकू शकला असता”

कोल्हापुरात कोरोना सेंटरमध्ये बाप्पाचं आगमन, मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते प्रतिष्ठापना

6 तासांपेक्षा अधिक वेळ सीबीआयद्वारे सुशांतच्या घराची तपासणी

‘हो…दाऊद इब्राहिम आमच्याच देशात’; अखेर पाकिस्तानने दिली कबूली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या