बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बीसीसीआयशी पंगा घेणाऱ्या विराटला कपिल देव यांचा मोलाचा सल्ला, म्हणाले…

नवी दिल्ली | काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. महान फलंदाज आणि भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून बीसीसीआयनं हटवल्यापासून संघात दुफळी माजल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आता भारताचा माजी कर्णधार महान खेळाडू कपिल देव यांनी विराट कोहलीचे कान टोचले आहेत.

बीसीसीआयचं अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराट कोहली यांनी एकमेकांच्या विरूद्ध वक्तव्य केली आहेत. परिणामी आता कोण खरं बोलत आहे अन् कोण खोटं बोलत आहे, अशी चर्चा रंगली आहे. यावर भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणारे कर्णधार कपिल देव यांनी विराट कोहलीला थोडा संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. ही वेळ एकमेकांवर टीका करण्याची नाही तर संघाच्या हिताचा विचार करण्याची आहे.

मला न सांगताच कर्णधारपदावरून हटवण्यात आलं फक्त 1 तास अगोदर मला सांगण्यात आलं, असं विराट कोहली म्हणाला होता. दक्षिण आफ्रिकेसारखा महत्त्वाचा दौरा तोंडावर असताना अशाप्रकारचं बोलणं योग्य नसल्याचं कपिल देव यांनी म्हटलं आहे. कृपाकरून आपल्या खेळाकडं लक्ष द्या.  सौरव असो किंवा विराट एकमेकांबद्दल अशी टीका टीपण्णी करणं योग्य नसल्याचं मत देव यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्मा एकमेकांच्या नेतृत्वाखाली खेळायला तयार नाहीत अशा प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. माझ्यात आणि रोहित शर्मामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं विराट कोहलीनं स्पष्ट केलं आहे. पण विराटनं गांगुलीच्या वक्तव्याला खोटं ठरवल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या 

…अन् यशपाल शर्माने मद्रासचा राग मँचेस्टरमध्ये काढला, पाहा व्हिडीओ

आता श्रेयवादाची लढाई सुरू?, शिवाजीराव आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला

बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“राज साहेब माझं काय चुकलं?”, पुण्यापाठोपाठ औरंगाबाद मनसेमधील अस्वस्थता उघड

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More