पुणे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

करंदी येथील कंपनीकडून झाडांची बेकायदा तोड

पुणे | शिरुर तालुक्यातील करंदी येथील गायरानात एका कंपनीकडून बेकायदा वन खात्याच्या जागेत रस्त्याचे काम सुरु आहे. याबाबत वन व महसूल खात्यांकडून पंचनामे करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कारवाईच होत नसल्याने करंदी येथील ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.

या प्रकरणी पर्यावरण मित्र संघटनेचे सागर वर्पे, क्रांती युवा संघटनेचे अध्यक्ष विकास दरेकर, संग्राम ढोकले, योगेश ढोकले व स्वप्नील ढोकले यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

करंदी-केंदूर रस्त्याशेजारुन वन विभागाच्या हद्दीत संकल्प फोर्जिंग कंपनीकडून गट नं. 1017 मधील वनविभागाच्या हद्दीतून गेल्या महिनाभरापासून रस्त्याचे काम सुरु असून, बेकायदेशीर पार्किंग व गोडाऊनचे अतिक्रमण झाले आहे.

गेल्या महिनाभरापासून तब्बल सहा तक्रार अर्ज तहसीलदार, जिल्हाधिकारी व जुन्नर वन विभागाकडे केल्यानंतर महसूल व वन विभागाकडून पंचनामे झाले. मात्र कारवाई होत नसल्याने सागर वर्पे व सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या