शूर्पनखेप्रमाणे तुझंही नाक कापू, करणी सेनेची दीपिकाला धमकी

राजस्थान | ज्याप्रमाणे लक्ष्मणानं शूर्पनखेचं नाक कापलं होतं, त्याप्रमाणं करणी सैनिकही तुझं नाक कापतील, अशी धमकी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला करणी सेनेचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष महिपाल मकराणा यांनी दिलीय.

सिनेमा ठरलेल्या तारखेलाच प्रदर्शित होणार असं दीपिकानं म्हटलं सांगितलं होतं. तिच्या या वक्तव्यावर करणी सेनेनं धमकी दिलीय. पद्मावती सिनेमा प्रदर्शित होण्यापासून वाद सुरू असल्यानं असं वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डाला बांधिल आहोत. सिनेमा प्रदर्शित होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, असंही दीपिकानं म्हटलं होतं.