कर्नाटकात रहायचं असेल तर कानडी भाषा यायलाच पाहिजे!

बंगळुरु | कर्नाटकात रहायचं असेल तर कानडी भाषा यायलाच हवी, असं वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलंय. बंगळुरुत आयोजित कर्नाटक राज्याच्या 62 व्या वर्धापनदिनात ते बोलत होते. 

आपण कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही. मात्र कर्नाटकात राहून कानडी भाषा शिकली नाही तर तो तिचा अपमान, असं ते म्हणाले. 

दरम्यान, कर्नाटक राज्याच्या स्वतंत्र झेंड्याचा मुद्दा सिद्धरामय्या यांनी पुन्हा उपस्थित केला. आहे तो झेंडा तसाच ठेवायचा की त्यात काही बदल करायचे याचा निर्णय यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती घेईल, असंही त्यांनी सांगितलं.