बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् भर विधानसभेत ‘या’ काँग्रेस आमदारानं काढला शर्ट

बंगळुरू | महाराष्ट्रात महापालिकेत झालेल्या गोंधळवरून राजदंड पळविण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. परंतु, निषेध व्यक्त करायचा म्हणून कर्नाटकच्या एका आमदाराने सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी थेट विधानसभेत शर्ट काढून निषेध केला आहे.

कर्नाटकच्या भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार बी. के. संगमेश यांनी विरोध करत असताना घोषणाबाजी करत त्यांचा शर्ट काढल्याने त्यांना 7 दिवस विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान हा सर्व प्रकार पाहून विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांनी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना आपल्या पक्षातील आमदारांना नियंत्रणात ठेवण्याची विनंती केली आहे. संगमेश यांनी विधानसभेचा अवमान केल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना 7 दिवस निलंबित केलं आहे.

या प्रकरणी बोलताना आमदार बी. के. संगमेश यांनी आपण फक्त निषेध व्यक्त करत होतो आणि न्यायाची मागणी करत होतो. त्यामुळे अनवधानाने शर्ट काढला तर त्यात काही गैर आहे, असं मला वाटत नाही. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

तब्बल 500 दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘या’ देशाचा दौरा

रूसलेल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी कायपण…; तरूणाने केला ‘हा’ कारनामा

शाहीनबाग आंदोलनाला तापसी, अनुरागने पैसा पुरवला- कंगना रनौत

बॉलिवूडमधील दिग्गज दडपशाहीविरोधात गप्प का आहेत?- संजय राऊत

कॉमेडी किंग जॉनी लिव्हरचा मुलांसोबतचा व्हिडिओ व्हायरल, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More