आता अभिनेता परेश रावल यांना शोधतेय करणी सेना!

मुंबई | पद्मावती सिनेमाला विरोध करणारी करणी सेना आता अभिनेता परेश रावल यांना शोधत आहे. राजा महाराजांना माकड म्हटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. गुजराती भाषेत असलेल्या या व्हिडिओत परेश रावल यांनी राजा-महाराजांना माकड म्हटलंय, असं सांगण्यात येतंय. या प्रकारानं करणी सेनेचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झालेत. 

दरम्यान, आपल्याला राजा-महाराजांना नव्हे तर हैदराबादच्या निजामाला तसं म्हणायचं होतं, मात्र तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असं परेश रावल यांनी म्हटलंय.