मुंबई | रेणू शर्मा यांच्यानंतर आता करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंविरोधात तक्रार केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांना केलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. हे आरोप नेमके काय आहेत हे जाणून घेऊया-
1. माझे पती धनंजय मुंडे यांनी माझ्या मुलांना जबरदस्तीने 3 महिन्यांपासून डांबून ठेवले आहे. माझ्या मुलांना मला भेटू दिलं जात नाही, तसेच त्यांच्यासोबत फोनवरही बोलू दिलं जात नाही.
2. 24 जानेवारी रोजी मी जेव्हा चित्रकुट बंगल्यावर माझ्या मुलांना भेटायला गेली तेव्हा धनंजय मुंडे यांनी 30-40 पोलिसांना बोलवून मला मुलांना भेटू दिलं नाही.
3. धनंजय मुंडे यांना विधानसभेतून त्वरित बरखास्त करा. तसेच त्यांना भविष्यात निवडणूक लढण्यास बंदी घाला.
4. धनंजय मुंडेंच्या चित्रकूट बंगल्यावर माझी मुलं सुरक्षित नाहीत, कारण माझी मुलगी 14 वर्षांची असून बंगल्यावर कुणीही महिला केअरटेकर नाही.
5. मला मुलांना भेटू दिलं जात नाही. जर मला माझ्या मुलांना भेटू दिलं नाही तर मी येत्या 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे.
6. मला चित्रकूट बंगला, मंत्रालय किंवा आझाद मैदानात उपोषणाला बसण्याची परवानगी द्यावी, तसेच धनंजय मुंडे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी.
महत्त्वाच्या बातम्या-
धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहे का?- तृप्ती देसाई
एकीकडे आईचे आरोप तर दुसरीकडे… धनंजय मुंडेंच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल
‘पोलिसांनी मला सहकार्य न केल्यास…’; करूणा शर्मा यांनी दिला ‘हा’ इशारा
रेणू शर्मांनंतर आता करुणा शर्मा; नव्या आरोपांनी धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत
‘या’ तारखेपासून महाविद्यालये पुन्हा सुरु होणार; उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा
Comments are closed.