मुंबई | राजकारणात उडी घेतल्यानंतर करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तर करूणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
करूणा शर्मा यांनी पंढरपूरात याबाबतची घोषणा केली. ही घोषणा करताना करूणा शर्मा यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. राजकारण कसं चालतं हे गेली 25 वर्षे मी पाहत आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर, धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर तो सुपर डुपर चालेल, असं वक्तव्य करूणा शर्मा यांनी केलं आहे.
गेल्या वर्षी करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर धनंजय मुंडे व करूणा शर्मा यांच्यातील वाद प्रकर्षाने समोर आला. करूणा शर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती.
दरम्यान, करूणा शर्मा यांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी समाजमाध्यमांवर त्यांच्या व करूणा शर्मा यांच्या नात्याची कबुली दिली होती. करूणा शर्मा आणि आपले संबंध असून कुंटुंबीयांना ही बाब अवगत असल्याचं देखील धनंजय मुंडे म्हणाले होते.
थोडक्यात बातम्या-
Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी
Russia Ukraine War | रशियन सैनिकांविषयी ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर
“माझा नंबर पहिला येतो, पण काही लोक….”; फडणवीसांचा घणाघात
उन्हाच्या तडाख्यानंतर ‘या’ भागात पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा
‘…अजून चार पेन ड्राईव्ह पुढे येणार’; दानवेंच्या नव्या दाव्यानं खळबळ
Comments are closed.