बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘घरात बसलेलं तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमलं’; लोकलच्या निर्णयानंतर भाजपची प्रतिक्रिया

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना मुंबईच्या लोकलसेवेबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनापासून लोकल चालू होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. अशातच या निर्णयावरून भाजपने राज्य सरकावर निशाणा साधला आहे.

सविनय कायदेभंगाच्या लढ्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे 15 ऑगस्ट 2021 ला मुंबईकर स्वतंत्र झाला. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले, अभिनंदन मुंबईकर असं भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या आंदोलनानंतर अखेरीस मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना लोकल प्रवासाची बुद्धी झाली. पण दोन डोस झालेल्यांसाठी वेगळी परवानगी काढायची अट कशाला ठेवलीत? एरवी उठसूठ केंद्राकडे बोट दाखवता पण लशीच्या डोसाच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारनेच तयार केलेल्या आरोग्य सेतू ॲपचा वापर का करत नाही?, असंही केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

दोन डोस घेतलेल्यांना लोकल सेवेचा लाभ घेता येणार आहे. मात्र त्यासाठी तुमचं एका अॅपवर रजिस्टर असणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यावर त्यांना एक पास मिळणार आहे. तो पास असेल आणि लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 झाले असतील तरच लोकसमधून प्रवास करता येणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

मुंबई कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

इंग्लंडच्या मदतील आला पाऊस, पहिला कसोटी सामना अनिर्णित!

मोठी बातमी! मुंबई लोकलसेवा सुरू, मात्र काढावा लागणार ‘हा’ पास

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

मराठे गोष्टी सांगत नाहीत तर ते इतिहास रचतात- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More