“एक स्वतंत्र राष्ट्र खलिस्तानचा पंतप्रधान…”; कुमार विश्वास यांच्या आरोपाने राजकारणात खळबळ
चंदीगड | देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवरून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. विरोधक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. त्यातच आता पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल फुटीरतावाद्याचे समर्थक आहेत, असं कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे.
एक तर पंजाबचा मुख्यमंत्री बनेन किंवा एक स्वतंत्र राष्ट्र खलिस्तानचा पंतप्रधान बनेल, असं अरविंद केजरीवाल म्हटल्याचं कुमार विश्वास यांनी सांगितलं आहे. पंजाब एक राज्य नाही तर एक भावना आहे हे अरविंद केजरीवाल यांनी समजून घेतलं पाहिजे. मी आधीही त्यांना म्हणालो होतो की, फुटीरतावादी आणि खलिस्तानी संघटनांसोबत काम करू नका. तेव्हा केजरीवालांनी सांगितलं की, असं काहीही होणार नाही.
मुख्यमंत्री कसे बनणार याचा फॉर्म्युलाही सांगितल्याचं विश्वास कुमार यांनी म्हटलं आहे. कोणीही मान्य करो अथवा न करो,ते एखादा बाहुला बसवतील आणि काहीही करतील. भगवंत कौर यांना निवडणूक लढवायला लावणार आणि मी तिथं जाईल. त्यांनी मला एवढ्या भयंकर गोष्टी सांगितल्या आहेत. त्या गोष्टी पंजाबमधील बहुतांश जनतेला माहिती आहेत, असं कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कुमार विश्वास हे आम आदमी पक्षाचे नेते होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी अरविंद केजरीवाल आणि कुमार विश्वास यांनी एकत्रित साथ दिली होती. परंंतु, अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यावर मतभेद झाले. कुमार विश्वास यांनी आम आदमी पक्षाच्या धोरणांवर जाहीरपणे टीका केली. त्यातच आता केजरीवालांबाबत वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
“उद्धवजींना एकच सांगू इच्छितोे की, संजय राऊत तुम्हाला घेऊन एकदिवशी नक्कीच डूबणार”
एका रात्रीचे किती घेतेस विचारणाऱ्याला मुनमुन दत्ताने झाप झापलं, म्हणाली…
पॅन कार्ड हरवताच केवीन पीटरसनची मदतीसाठी पंतप्रधान मोदींकडे धाव, म्हणाला…
‘या’ कारणामुळे बप्पी लाहिरी घालायचे सोन्याचे दागिने!
‘पातेलंभर तूपासोबत 30-35 पुरणपोळ्या देवेंद्रजी सहज खायचे’, अमृता फडणवीसांचा खुलासा
Comments are closed.