बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कुटुंबाची तर पवारांना बारमालकांची काळजी, सामान्य माणसा तुच तुझा वाली”

मुंबई | लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पवार साहेबांना बारमालकांची काळजी आणि सामान्य माणसा तुच तुझा वाली, अशा शब्दात उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे.

लॉकडाऊन पुन्हा वाढला. मुख्यमंत्री म्हणालेच होते, माझे कुटुंब, माझी जबाबदारी!… सामान्यमाणसा,नोकरदारा, बलुतेदारा, नोकरदारा, कष्टकरी मजुरा, तूचआहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडलं आहे, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केलीये.

तुझा EMI, तुझ घरखर्च, तुझ लाईटबिल तुच पहा. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, पवार साहेबांना बारमालकांची काळजी, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाहीत वसुली सरकार मध्ये पोलिसात वाजे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका आहे, सामान्य माणसा तुच तुझा वाली, असं म्हणत केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. यानंतर आता हे निर्बंध येत्या 1 जूनपर्यंत लागू राहणार आहेत. याबाबतचे परिपत्रक शासनाने जाहीर केलं आहे. यानुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं आवश्यक आहे.

थोडक्यात बातम्या- 

“गांजाच्या शेतीसाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागावी”

मोठी बातमी! पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट समोर लागली मोठी आग

“देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंगांच्या हातात द्या”

“पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’”

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More