बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सुप्रिया ताई, मन मोठं करा अन् अजितदादांना ‘हा’ सल्ला द्या”

मुंबई | ‘सर्वसामान्यांना महागाईची (Inflation) झळ बसली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसवरील कर कमी करावे त्यामुळे जनतेला दिलासा मिळेल,’ अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गुरूवारी लोकसभेत केली होती.

सुप्रिया सुळेंच्या या मागणीनंतर भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. ‘सुप्रिया ताई, मन मोठं करा! केंद्राच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याऐवजी हा सल्ला थेट अजित पवार (Ajit Pawar) यांना द्या. ते तुमचं तरी ऐकतात का पाहू’,असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला आहे.

‘केंद्राने (Central Goverment) अगोदरच कर कपात करून इंधन दर कमी केले आहेत. आता पाळी आहे जनतेच्या खिशातून ओरबाडणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी वसुली सरकारची’, असा खोचक टोला केशव उपाध्ये यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.

दरम्यान, शून्य प्रहाराला गरजेच्या वस्तूंची भाववाढ आणि महागाई यावर चर्चा करताना सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला होता. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी इंधनावरील कर कमी करण्याचा सल्ला सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारला दिला.

 

थोडक्यात बातम्या-

बंपर ऑफर! iPhone 12 Pro वर मिळतोय सर्वात मोठा डिस्काउंट

चिंताजनक! पुणे-मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा; ‘ही’ गोष्ट ठरतेय कारणीभूत

भावाची हवा! पेट्रोल महागलं म्हणून पठ्ठ्या थेट घोड्यावर निघाला काॅलेजला

शिवसेनेचा मनसेला दे धक्का! राज ठाकरेंच्या दौऱ्याआधीच मनसेला मोठी खिंडार

तुमचेही केस गळतात का? मग ‘या’ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More