मुंबई | अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketki Chitale) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. केतकी चितळेनं शरद पवरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर केतकी चांगलीच अडचणीत सापडली.
शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली. केतकीच्या कोठडीत अनेकदा वाढ झाल्यानंतर बुधवारी अखेर तिचा जामीन मंजूर झाला.
20 हजार रूपयांच्या जातमुचकल्यावर केतकीचा जामीन मंजूर करण्यात आला. तब्बल 40 दिवसांनंतर केतकीची तुरूंगातून सुटका झाली आहे. चेहऱ्यावर स्मितहास्य कायम ठेवत केतकी तुरूंगातून बाहेर आली.
दरम्यान, केतकीने तुरूंगातून बाहेर येताच जय हिंद, जय महाराष्ट्र अशी प्रतिक्रिया दिली आहे. केतकीने शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर सर्वच स्तरांवरून केतकीवर टीका करण्यात आली होती.
थोडक्यात बातम्या-
खरंच चार्टर्ड प्लेनने आला होतात का?, ‘त्या’ फोटोंवर नितीन देशमुखांची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदेंच्या बंडाळीवरून अजित पवारांचं भाजपला क्लिनचीट, म्हणाले…
‘घरचे दरवाजे उघडे आहेत, चर्चा होऊ शकते’; संजय राऊतांचं बंडखोर आमदारांना आवाहन
मोठी बातमी! आणखी दोन आमदार गुवाहाटीसाठी रवाना, शिवसेनेतील गळती कायम
‘आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Comments are closed.