sadabhau khot - आमच्या मिशीला खरकटं असेल तर नाकाला रुमाल लावा!
- महाराष्ट्र

आमच्या मिशीला खरकटं असेल तर नाकाला रुमाल लावा!

कोल्हापूर | आमच्या  मिशीला खरकटं लागलंय, असं कुणाला वाटत असेल तर त्यांनी आपल्या नाकाला रुमाल लावावा. आम्ही आमची मिशी पुसून स्वच्छ करु, अशा शब्दात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर पलटवार केलाय. आमच्या मिशीला कुणाचं खरकटं नाही, असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं होतं.

दरम्यान, राजू शेट्टींनी आपल्या बगलबच्च्यांना लगाम घालावा, अन्यथा त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा