बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘धावांचा भूकेला राक्षस’ आता खेळताना दिसणार नाही!, गेलने केली निवृत्तीची घोषणा

मुंबई |  वेस्ट इंडिजचा आक्रमक आणि अतिशय स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता वेस्ट-इंडीजचं ‘वादळ’ शमणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी पाहायला मिळतीय.

यंदाच्या इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषकानंतर ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. नुकतीच त्याने याबद्दलची घोषणा केली आहे.

गेलने आपल्या कारकिर्दीत अनेक अप्रतिम आणि अफलातून खेळीने वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिलेत. त्याची गरज आणि आठवण वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला कायम भासत राहील.

एक नजर टाकूया ख्रिस गेलच्या कारकिर्दीवर-

284 वन डे सामने – 9727 धावा यात 23 शतकं तर 49 अर्धशतकं, 165 विकेट्स

103 कसोटी सामने – 7214 धावा – यात 15 शतकं तर 37 अर्धशतकं, 73 विकेट्स

56 टी 20 सामने – 1607 धावा,  यात 2 शतकांचा, 13 अर्धशतकं, 17 विकेट्स

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More