महाराष्ट्र मुंबई

धावत्या लोकलमध्ये किकी चॅलेंज करणारे मुलं सापडले

मुंबई | मुंबईतील धावत्या लोकलमधून मुलांनी किकी चॅलेेंज पुर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. अखेर त्या मुलांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

निशांत (20), ध्रूव शाह (23) आणि श्याम शर्मा (24) असं त्या तीन मुलांचं नाव असून त्यांना पश्चिम रेल्वेच्या आरपीएफने विरारमधून अटक केली आहे.

दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या आरपीएफचे विभागीय आयुक्त अनूप शुक्ला यांनी किकी चॅलेंजचा व्हिडिओ समोर येताच तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं. खबरींच्या मदतीने तरुणांबद्द्ल माहिती मिळताच पोलिसांनी तिघांसाठी सापळा रचला आणि बुधवारी त्यांना अटक केल्याची माहिती दिली. 

महत्त्वाच्या बातम्या–

-अॅट्रॉसिटीबाबत सर्व पक्ष गप्प का?

-औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक; रस्त्यावर टायर पेटवलं!

-राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी!

-पोलिसांची ड्रोनद्वारे मराठा मोर्चेकऱ्यांवर करडी नजर

-मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 7 हजार पोलीसांचा बंदोबस्त!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या