Top News देश

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उनचा खरंच मृत्यू झाला आहे का?

नवी दिल्ली | उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उनच्या प्रकृतीविषयी सध्या उलटसुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे किम जाँग उनचा खरंच मृत्यू झाला आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र अद्याप याबाबत कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

कशा सुरु झाल्या किम जाँगच्या मृत्यूच्या अफवा-

१५ एप्रिल रोजी किम जाँग उनचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग यांचा जन्मदिवस होता. या दिवशी उत्तर कोरियात मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यावर्षी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला किम जाँग उननं हजेरी लावली नाही, यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं. त्यामुळे किम जाँग उन आजारी असल्याच्या चर्चांना उधाण आलं.

दरम्यान, १२ एप्रिलपासून किम जाँग उन यांचा पत्ता कुणालाही नाही. ११ एप्रिल रोजी त्यांनी महत्त्वाची राजकीय बैठक बोलावली होती, त्यानंतर ते गायब आहेत. सध्या चीनचं एक वैद्यकीय पथक उत्तर कोरियाला रवाना झाल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

अहमदनगरच्या लेकीचा पराक्रम; आता अवघ्या 15 मिनिटात कळणार कोरोना आहे की नाही…

पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात डॉन अरुण गवळीची गरजूंना मदत, पाहा व्हिडीओ

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान करणार ‘मन की बात’; काय बोलणार याकडे देशाचं लक्ष

अबब!!! कोरोनासंदर्भात राज्यात तब्बल एवढ्या जणांवर गुन्हे दाखल

राज्यात दिवसभरात तब्बल 811 कोरोनाचे नवे रुग्ण; एकूण आकडा 7,628 वर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या