महाराष्ट्र मुंबई

राज्यातील अनैसर्गिक मृत्यूस सरकारच जबाबदार- शिवसेना

मुंबई | युद्ध न करता मरण पावलेले सैनिक आणि राज्यातील प्रत्येक अनैसर्गिक मृत्यूस राजाच जबाबदार असतो, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. आंबेनळी घाटात बस कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला, या मुद्द्यावरून सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर निशाणा साधला आहे. 

समृद्धी महामार्ग आणि बुलेट ट्रेनसाठी हट्ट धरणाऱ्यांनी महाराष्ट्राचा नागमोडी रस्ता समजून घेतला पाहिजे. बुलेट ट्रेनचे जपानी रूळ टाकले म्हणजे विकास नाही, तर दापोलीसारखे अपघात आणि सामुदायिक मृत्यू रोखण्यासाठी काम करणे हाच विकास आहे, असं सामनामध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, निवडणुका जिंकण्यासाठी ज्या जोर जबरदस्तीचा वापर होतो तेवढा जोर राज्याच्या कामकाजावर लावला तर हे असे शोकमय बळीचे राज्य निर्माण होणार नाही. हिंसाचार, जाळपोळ, आत्महत्या व अपघातांमुळे सध्या राज्याचे मानसिक खच्चीकरण सुरू असल्याचीही टीका अग्रलेखातून केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मैदानात; आमदारांची बोलवली बैठक!

-आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल!

पुरावे असतील तर बोला, मराठा संघटनांना बदनाम करू नका!

-आता खासदार-आमदारांची खैर नाही; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

-मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू नका; मराठा मोर्चेकऱ्यांच्या बैठकीत निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या