बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! पुणे पोलिसांनी अखेर किरण गोसावीच्या मुसक्या आवळल्या

पुणे | कार्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात पंच असलेला किरण गोसावी हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. तसेच त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देत तो फरार झाला होता.

किरण गोसावीने लखनऊ पोलिसांना शरण जाण्यासाठी विनंती केली होती. पण त्यांनी त्याला नकार दिला. त्या संभाषणाच्या आधारे पुणे पोलिसांची एक तुकडी त्याला पकडण्यासाठी लखनऊला रवाना झाली होती. पण तो तिथुनही पोलिसांना गुंगारा देत फरार झाला.

अखेर पुणे पोलिसांना किरण गोसावीच्या मुसक्या आवळण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार सध्या किरण गोसावी हा पुणे पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान या प्रकऱणात किरण गोसावीवर ड्रग्ज प्रकरणातील चौकशीशी संबंधित अनेक गंभीर आरोप आहेत..

किरण गोसावीने आर्यन खान प्रकऱणात पैसे घेतल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यानुसार आता पोलिस त्याची चौकशी करतील. या चौकशीत नेमकं काय निष्पन्न होणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

आर्यन खानचं भविष्य आज ठरणार; जामीनावर होणार सुनावणी

महामार्गावरील ढाब्यावरच पेट्रोल पंप, काय आहे नितीन गडकरींचा हा नवा प्लॅन?

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता मुंबई पोलिसांचीही उडी! करणार ‘हा’ तपास

“एका महिलेशी कसं बोलावं हे पवारसाहेबांनी शिकवलं नाही का?”

“पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की मोदींची दाढी एक इंच वाढते”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More