मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा सपाटा सुरु आहे. यावरुन आता वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांतप्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप राऊत यांनी केला आहे.
किरीट सोमय्या, नील सोमय्या व ईतर काही जणांवर ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. माजी सैनिक बबन भोसले (Baban Bhosle) यांनी बुधवारी रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात जाऊन ही तक्रार दाखल केली आहे. अशातच आता अडचणी वाढताना पाहून किरीट सोमय्यांनी नवी खेळी सुरु केली आहे.
आज सकाळी सोमय्या जरंडेश्वर साखर कारखान्यातील सभासद शेतकऱ्यांना घेऊन मुंबईतील ईडी कार्यालयात पोहचले आहेत. जरंडेश्वर साखर कारखाना हा आता 27 हजार भागधारक शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी यावेळी किरीट सोमय्या यांनी केली.
दरम्यान, यानंतर जरंडेश्वर कारखान्याबाबत ईडीकडून आणखी कोणती नवी कारवाई केली जाणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
थोडक्यात बातम्या –
वसंत मोरेंना मनसेचा झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
‘या’ गोष्टींमुळे मुली जाऊ लागतात मुलांपासून दूर, वेळीच व्हा सावध
‘देशद्रोही निर्लज्ज माणूस’, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्लाबोल
एसटी कर्मचाऱ्यांसाठी ‘ही’ दिलासादायक बातमी आली समोर
संजय राऊतांचा थेट फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले…
Comments are closed.