बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किरीट सोमय्यांचा हा दौरा म्हणजे केविलवाणा तमाशा- अमोल मिटकरी

मुंबई | महाविकास आघाडी आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाद वाढला आहे. किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ सध्या दवाखान्यात आहेत. किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर अडून बसले आहेत. राज्यात सर्वत्र राजकीय गोंधळ सुरू आहे.

किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाबंदी केली आहे. सोमय्या यांनी कसल्याही परिस्थितीत कोल्हापूरला जाऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केल्याने आता राज्यातील राजकारण रंगलं आहे. राष्ट्रवादीसह महविकास आघाडीतील सर्व पक्ष किरीट सोमय्या यांच्यासह भाजपवर आरोप करत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शेलक्या शब्दात सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोमय्या केविलवाणा प्रकार करत आहेत. राजकारणात संपलेलं अस्तित्व आणि स्वतःच्याचं पक्षात संपुष्टातं आलेली कारकिर्द पुन्हा प्रस्थापित करण्याचा सोमय्या यांचा केविलवाणा तमाशा सुरु आहे. सोमैया यांची अवस्था पडद्यामागच्या नेत्यांनी न घर का न घाट का अशी दयनीय करून ठेवली आहे, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी सोमय्यांवर टीका केली आहे.

कोल्हापूर पोलिसांनी सकाळीच कराडमध्ये सोमय्या यांना ताब्यात घेतलं आहे. कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

थोडक्यात बातम्या 

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पोलिसांनी किरीट सोमय्यांना रेल्वेतून उतरवलं, राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता

…म्हणून पोलीस आयुक्तांनी मानले पुणेकरांचे आभार!

पहिला घोटाळा बाहेर काढताच दवाखान्यात गेले, दुसरा काढला तर….- किरीट सोमय्या

किरीट सोमय्यांना कोल्हापूरच्या वेशीवरच अडवलं जाणार?, जिल्हा प्रशासनाने दिले जमावबंदीचे आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More