बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जोड्यानं मारू मला म्हणताय की रश्मी ठाकरेंना?”

नवी दिल्ली | भाजपनेेते किरीट सोमय्या व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सध्या कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केलेल्या आरोपांना किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत अलिबाग येथील बंगल्यांचा उल्लेख करत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. अलिबागमधील 19 बंगले ठाकरेंचेच असल्याचा घणाघात सोमय्यांनी केला आहे.

अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला. तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनीदेखील टॅक्स भरला. बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरेंनी भरला, त्यामुळे संजय राऊत आता जोड्याने कुणाला मारणार? जोड्याने मारू मला म्हणताय की रश्मी ठाकरेंना?, असा खोचक सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, 19 बंगल्यांवर घेऊन जातो, बंगले दिसले तर जोडे मारतो, असं राऊत म्हणाले होते. यावर बोलताना आता जोडे नेमके कोणाला मारायचे, असा सवालही सोमय्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘बाप बेटे जेल मधे जाणार’, संजय राऊतांचं सूचक ट्विट

Lassa Fever | ओमिक्रॉननंतर लासा फिवरची दहशत, ‘या’ व्यक्तींना आहे सर्वात जास्त धोका

डिस्को किंग काळाच्या पडद्याआड, सुप्रसिद्ध गायक बप्पी लाहिरी यांचं निधन

प्रसिद्ध पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा भीषण अपघातात मृत्यू

संजय राऊतांच्या आरोपावर किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More