बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठी फेरीवाल्याच्या नोटा फाडल्याचा आरोप; किरीट सोमय्याविरोधात गुन्हा

मुंबई | मराठी फेरीवाल्याच्या 50 रुपयांच्या नोटा फाडल्याप्रकरणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. याप्रकरणी सोमय्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

संभाजीराजे मैदानात जनसंपर्क अभियानासाठी पोहोचलेल्या सोमय्यांना मैदानात होत असलेल्या बांधकामावरुन लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. यावेळी नागरिकांनी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुनही त्यांना धारेवर धरलं.

दरम्यान, चिडलेल्या सोमय्यांनी याच भागात बसलेल्या सचिन खरात नावाच्या आंबेविक्रेत्याच्या हातातील नोटा हिसकावून फाडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दखलपात्र गुन्हा नोंदवावा अशी मागणी मनसेचे माजी नेते शिशिर शिंदे यांनी केलीय. 

महत्त्वाच्या बातम्या –

-शिवसेनेचा पराभव करण्यासाठी भाजपचा थेट राष्ट्रवादीला पाठिंबा

-नीता अंबानींना मोठा झटका; मुंबई इंडियन्स आयपीएलबाहेर…

-पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

-सडक्या कांद्याला रुपयाची बोली, सदाभाऊंच्या फोटोला मात्र भाव नाही!

-कुमारस्वामींपेक्षा पत्नी राधिकाकडे 3 पट अधिक संपत्ती

-लोक आता आपल्या कुत्र्याचं नाव वजुभाई वाला ठेवतील- निरुपम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More