महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का?- किरीट सोमय्या

मुंबई | शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का?, असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर या नावाला विरोध केला आहे. तेव्हा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. शिवसेनेने त्यांचा भगवा हिरवा झाला आहे का, याचं उत्तर द्यावं, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.

सध्या राज्यात शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहे. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं, ही शिवसेनेची पूर्वीपासूनची मागणी आहे. मात्र आता काँग्रेससोबत सत्तेत बसल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली आहे. तर काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पत्नीसाठी अनिल देशमुख यांनी येरवडा कारागृहातून खरेदी केली पैठणी!

आमदार दिलीप बनकरांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!

हाफ चड्डी घालून भाषणं करणं हा राष्ट्रवाद नव्हे तर…- सचिन पायलट

“महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे”

माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या