बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दिवाळीपूर्वीच अनिल देशमुख तुरुंगात जाणार, त्यानंतर…’; सोमय्यांच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई | दिवाळीपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागेल. त्यानंतर अनिल परब यांचा नंबर लागेल. नंतर हसन मुश्रीफ यांच्यावरही कारवाई होणार आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

अनिल परब यांची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट परब यांनीच राज्यातील साडेबारा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे. राज्यात लॉकडाऊन असताना परब यांनी स्वत:चं रिसॉर्ट बांधण्यासाठी थ्री फेसच्या एमएसईबीचं कनेक्शन घेतलं. लॉकडाऊन असताना परब बेकायदेशीरपणे रिसॉर्ट बांधत होते. याची त्यांना लाज वाटली पाहिजे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे स्टंटबाज आहेत. ते लक्ष डायव्हर्ट करण्याचं काम करत आहेत. उद्धव ठाकरेंनी नेमलेले मंत्री, पोलीस आयुक्त फरार झाले आहेत. हे सरकार सामान्य जनतेचं नव्हे तर घोटाळेबाजांचं नेतृत्व करत आहे, अशी घणाघाती टीकाही किरीट सोमय्या यांनी केली आहे.

मला आणि माझ्या मुलालाही धमक्या मिळत आहेत. पण आम्ही या धमक्यांना घाबरत नाही. तुमच्या काय मी उद्धव ठाकरेंच्या धमक्यांनाही घाबरत नाही. परब यांना आज ना उद्या कोर्टात जावंच लागणार आहे. परब हे जेलमधूनच कोर्टात जाऊ शकतात, असंही किरीट सोमय्या म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात दाखल

पुढील दोन-तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा इशारा

सोनू सूदवर गंभीर आरोप; Income Tax च्या छापेमारीनंतर धक्कादायक माहिती समोर

“मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?”

“दिलेला शब्द मोडत नाही ही शिवसेनेची खासियत आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More