बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी”

नाशिक| भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नाशिक येथे पत्रकारपरिषदेत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्या संपत्तीची माहिती द्यावी, असं खुलं आवाहन किरीट सोमय्यांनी केलं आहे.

विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांच्या काळात छगन भुजबळ यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. अशातच पुन्हा एकदा किरीट सोमय्यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मुंबई येथील ज्या 9 मजली इमारती मध्ये छगन भुजबळ राहतात, त्या इमारतीशी भुजबळांचा काय संबंध आहे हे छगन भुजबळांनी स्पष्ट करावं, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळ यांच्यावर 120 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा देखील आरोप केला आहे. आर्मस्ट्राँगच्या नावाने भुजबळांनी काळा पैसा व्हाईट केला. तसेच 9 मजली इमारतीचे मालक परवेज कन्स्ट्रक्शन प्रा. लि. हे मालक दाखवले आहेत. त्यामुळे ईडीने छगन भुजबळ यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत कारवाई केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माझं खुलं आवाहन आहे की, त्यांनी या प्रकरणाचा खुलासा करावा, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“घंटानाद करा, नाही तर आणखी कसला नाद करा, पण आमचा नाद करू नका”

ख्रिस्तियानो रोनाल्डोची घरवापसी, दोन वर्षाच्या कराराची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

‘…अन्यथा कडक निर्बंध लावावे लागतील’; एकनाथ शिंदेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मांस, दारू विक्रीबाबत मथुरेमध्ये आदित्यनाथांनी घेतला मोठा निर्णय!

येत्या निवडणुकांबाबत हसन मुश्रीफांचं मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More