बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयकर धाडीनंतर सोमय्या म्हणतात, पवार साहेब जरंडेश्र्वरचा खरा मालक कोण?

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यांशी संबंधित असलेले साखर कारखाने आणि व्यवस्थापकांच्या घरी आयकर विभागानं धाडसत्र सुरू केलं आहे. एकापाठोपाठ एक असा आयकर विभागाने कारवाईचा सपाटा लावला आहे. कारवाई होत असलेले सगळेच कारखाने अजित पवारांच्या संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. आयकर विभागाच्या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे.

अजित पवार आणि माध्यमांमुळे कळलं की आयकर विभागाची धाड सुरू आहे. या धाडी कशासंदर्भात सुरू आहेत हे अजित पवारच चांगल्या प्रकारे सांगू शकतात. अजित पवारच नव्हे तर देशातील कोणत्याही निर्दोष व्यक्तिला तपास यंत्रणांनी हैराण करू नये, अशी आमची पण भूमिका आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

पण तुम्ही पाप केलं आहे, घोटाळे केले असतील तर ते कबूल करा. मी कालही जरंडेश्र्वर येथे जाऊन आलो. अजित पवारही काही दिवसांपूर्वी जाऊन आले होते. मग पवारसाहेब जरंडेश्र्वरचा खरा मालक कोण? हे तुम्हीच आम्हाला सांगा अशी माझी त्या 27 हजार शेतकऱ्यांकडून विनंती आहे, अशी खोचक प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी दिली आहे.

अजित पवार साखर कारखाने ढापले त्याबद्दल का बोलत नाहीत? जर एवढा चांगला कारखाना चालू शकतो तर तो आमच्या नावावर का नाही?, असं शेतकरी विचारत आहेत. चोरी केली आहे तर ती कबूल करा, असा घणाघातही किरीट सोमय्यांनी केला. आज सकाळपासूनच जरंडेश्र्वर साखरसोबतच अंबालिका शुगर, नंदुरबार, दौंड शुगर, पुष्पदनतेश्र्वर या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू आहे. तर अंबालिका कारखाना अजित पवारांच्या खासगी मालकीचा आहे.

 

थोडक्यात बातम्या-

आता देवीच्या मंडपात फक्त 5 जणांनाच परवानगी, वाचा सविस्तर

कारखान्यावरील धाडीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आरोग्यमंत्र्यांनी केली नवीन योजनेची घोषणा, काय आहे ‘मिशन कवच कुंडल’?

आयकर विभागाच्या छाप्यानंतर जयंत पाटलांनी केली अजित पवारांची पाठराखण, म्हणाले…

आर्यन खानसोबत दिसलेल्या ‘या’ भाजप नेत्याचं स्पष्टीकरण, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More