बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी असते तर थोबाड फोडून टाकलं असतं- किशोरी पेडणेकर

मुंबई | भाजप नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात एका कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. कारण साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर भाजपच्या महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. अशात भाजपच्याच कार्यालयात एका कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपची ताईगिरी कुठे गेली, असा सवाल करत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं पेडणेकरांनी म्हटलं आहे. त्या मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.

आज महिलांच्या विषयावर धाय मोकलून रडणाऱ्या भाजपच्या ताईंचा फोन सकाळपासूनच स्विच ऑफ आहे, त्यांच्या पक्षातील कुणीच याबाबत बोलायला तयार नाही. कोणत्याही पक्षाची महिला असो, अन्याय होत असेल तर भूमिका घेतली पाहिजे, मी असते तर थोबाड फोडून टाकलं असतं, असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलं आहे.

भाजप नेहमीच महाराष्ट्राला बदमान करण्याचा प्रयत्नात असतं. खोटं रडून दाखवता. भाजपशासित राज्यात महिला अत्याचाराच्या घटना खूप घडत आहेत. आता ताईगिरी कुठे गेली? फोन बंद का?. मी स्वत: बोरिवलीच्या प्रकरणात लक्ष घालणार आहे. मी पोलीस स्टेशनला जाणार आहे, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“लोकांनी एकाचवेळी दोन ते तीन वेळा बटनं का दाबायची?”; राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल

कागलनंतर सोमय्यांच्या रडारवर पारनेर साखर कारखाना!

ओबीसी आरक्षणाबाबत धक्कादायक माहिती समोर!

मोठी बातमी! नाना पटोले आणि बाळासाहेब थोरातांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

‘या’ भारतीय कंपनीची इलेक्ट्रीक बाईक बाजारात दाखल; किंमत पेट्रोल बाईकपेक्षा कमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More