बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हता- किशोरी पेडणेकर

मुंबई | मुंबईत 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेने केलेला असतानाच पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं मध्य आणि हार्बर रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे. शिवसेनेनं केलेले सर्व दावे पहिल्याच पावसात फोल ठरले असून मुंबई शिवसेनेनं तुंबवून दाखवली असल्याची टीका भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत अजिबात पाणी तुंबणार नाही, असा दावा कधीच केला नव्हता, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईतील सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

मुंबईची भौगोलिक रचना सर्वांना माहित आहे. अनेक नाले हे समुद्राच्या खाली आहेत. त्यामुळे मुंबईत अजिबात पाणी तुंबणार नाही असा दावा कधीच केला नव्हता. पण पाणी भरलं तरी ते चार ते पाच तासांपेक्षा जास्त काळ तुंबून राहणार नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेनं कोरोनाच्या संकटात केलेलं काम संपूर्ण जगानं पाहिलं आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं जातं. आम्ही फक्त कामावर लक्ष देतो, असं त्या म्हणाल्या,

थोडक्यात बातम्या- 

राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे शरद पवारांच्या भेटीला; ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

‘मुख्यमंत्री लायक असते तर…’; नवनीत राणांची जहरी टीका

अनेक दिग्गज मंत्र्यासोबत काम करणारे विशेष अधिकारी राम खेडेकर यांचं निधन

संतापजनक! इन्स्टाग्राम स्टिकरमध्ये शिवशंकरांच्या हातात वाईनचा ग्लास, इन्स्टाग्रामविरूद्ध तक्रार दाखल

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! फक्त ‘एवढ्या’ दिवसांत तब्बल 53 हजार रूग्ण कोरोनामुक्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More