मुंबई | मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. जर ती केंद्राची जागा आहे, तर ती जागा महाराष्ट्राच्या कामासाठी मागत आहोत, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. त्या ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होत्या.
आई नीट जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना, अशी महाराष्ट्राची अवस्था करण्याचं षडयंत्र हे रचलं जात आहे, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
ज्या कामासाठी ती जागा मागत आहोत, ते काम लोकांचंच आहे. मीठागराच्या अशा अनेक जागा आहे. त्या डावलण्यात आल्या आहे. आपण बाजूला कुठे तरी मिठागर करु शकतो, असं किशोरी पेडणेकरांनी सांगितलंय.
आरे हे जंगल आहे. त्या ठिकाणच्या स्थानिकांनी विरोध केला होता. मात्र याबाबत नक्की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलतील. जर मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतात तर ते महाराष्ट्रावरही करतात. त्यामुळे जे निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे असतील, त्यावर नक्कीच विचारविनिमय केला जाईल, असंही किशोरी पेडणेकरांनी सांगितलंय.
महत्वाच्या बातम्या-
भयंकर महागाई ही भाजपकडून जनतेला दिवाळीची भेट- प्रियांका गांधी
‘राज्यात हजारो रोजगार उपलब्ध होणार’; ठाकरे सरकारचा 15 कंपन्यांसोबत सामंजस्य करार
मेट्रो कारशेडवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने!
मुकेश अंबानींना मोठा धक्का; फोर्ब्स बिलेनियर्सच्या यादीत अंबानींची 9 व्या स्थानी घसरण
कमलनाथ यांचा दर्जा परत घेण्याच्या आदेशाला स्थगिती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले…