बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फायनलपूर्वी कोलकाताच्या ‘या’ त्रिमुर्तीनं वाढवलं धोनी ब्रिगेडचं टेन्शन

नवी दिल्ली | भारतातील बहूचर्चीत क्रिकेट लीग आयपीएलचा आता शेवट जवळ आला आहे. भारताला नवीन खेळाडू देणाऱ्या या लीगचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ही बिरूदावली मिरवणारा 3 वेळेचा चॅम्पियन चेन्नई आणि 2 वेळंचा विजेता कोलकाता आमने-सामने येणार आहेत.

कोलकाता संघानं आपल्या अतुलनीय खेळाच्या जोरावर अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. जागतिक दर्जाचा कर्णधार ईयाॅन माॅर्गन कोलकाताचं नेतृत्व करत आहे. या संघातील सुनील नारायण, वरूण चक्रवर्ती आणि शाकिब अल हसन या खेळाडूंचा धसका धोनीच्या संघानं घेतला आहे. या तीनही खेळाडूंनी आपल्या खेळाच्या जोरावर सर्वांचं लक्ष आपल्याकडं वेधून घेतलं. त्यामुळे आता अंतिम सामन्यात देखील या खेळाडूंकडून कोलकाताला मोठी अपेक्षा आहे.

आपल्या चाणाक्ष नेतृत्वासाठी धोनी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत धोनीनं आपल्या नेतृत्वात चेन्नईला 9 वेळा अंतिम फेरीत आणण्याचा पराक्रम केला आहे. तरीही धोनीचा संघ कोलकाता संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. सुनील नारायणनं आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर बंगळुरूचा पराभव करण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. शाकीब अल हसन हा जागतिक दर्जाचा अष्टपैलू खेळाडू देखील अंतिम सामन्यात आपल्या खेळीनं चेन्नईच्या पराभवाचं कारण ठरू शकतो.

दरम्यान, कोलकता संघाचा अंतिम फेरीपर्यंत प्रवासात अनेक धक्कादायक निकाल नोंदवले आहेत. निव्वळ धावगतीच्या आधारावर अंतिम चार संघात स्थान मिळवल्यानंतर दिल्ली कॅपीटल्स आणि बंगळूरू या अव्वल संघाचा पराभव कोलकातानं केला आहे. कोलकाताच्या या त्रिमुर्तीचा चेन्नई कसा सामना करते हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या 

“…म्हणून शिवसेनेतून एक टपरीवाला आज मंत्री होऊ शकतो”

मोठी बातमी! समीर वानखेडे यांना मुंबई पोलिसांचं समन्स; ‘या’ प्रकरणात चौकशी होणार

“मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही, त्याचं मला फार दु:ख वाटत नाही”

“सावरकर देशातील स्वातंत्र्य वीरांचे मुकूटमणी, पण भाजप नेत्यांनी…”

पुढील 4 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ 14 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More